सोलापूर : काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी गुरुवारी दुपारी जिल्हा परिषदेमध्ये आयोजित केलेल्या रानभाजी आणि खाद्य महोत्सवाला भेट दिली यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेळके संतोष धोत्रे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी आमदार शिंदे यांनी फिरून सर्व स्टॉलची पाहणी केली. एका स्टॉलवर त्यांनी घोळाची भाजी व पालकाची पेंडी विकत घेतली. महोत्सवात हगलूर गावच्या सावित्रीबाई फुले बचत गटाला भेट देताना त्या ठिकाणी स्वयंपाक करणाऱ्या महिलांशी संवाद साधला.
कोणत्या गावचे म्हणून विचारतात महिलांनी हगलूर असे उत्तर दिले. तेव्हा मी अनेक वेळा हगलूर मध्ये आले आहे अभिजीत विकासला ओळखता का? असे त्यांनी महिलांना विचारले. या रानभाजी महोत्सवात प्रणिती शिंदे या रमून गेल्या होत्या.
दरम्यान या आयोजनाचे कौतुक करताना त्यांनी असे महोत्सव दर महिन्याला भरवावेत अशी अपेक्षा व्यक्त करत सोलापूरकरांनी या गावरान भाज्या खरेदी कराव्यात असे आवाहन केले..




















