सोलापूर ! विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते दक्षिण तालुक्यातील वळसंग या गावामध्ये 1937 साली भीमनगर मधील सर्व समाज बांधवांच्या वतीने बांधण्यात आलेल्या विहिरीचे उद्घाटन झाले होते
तो परिसर सुशोभीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून गेल्या सहा महिन्यापासून वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक तथा प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे पालकमंत्री दत्तामामा भरणे तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी या ठिकाणी भेट दिली आहे, या विहीर सुशोभीकरणासाठी पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीतून निधी मंजूर केला आहे सुशोभीकरणाचे काम जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात येणार आहे या प्रकरणाची फाईल जिल्हा परिषदेकडून जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालयाकडे जाणे गरजेचे आहे ,त्यानंतर कामाला सुरुवात होणार आहे. पण सध्या ही फाईल जिल्हा परिषदेमध्ये अडकून पडली आहे गुरुवारी वंचित बहुजन आघाडीचे नेते आनंद चंदनशिवे हे जिल्हा परिषदेत आले होते त्यांनी मुख्य वित्त व लेखा अधिकारी अजयसिंह पवार यांना सोबत घेऊन अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांची भेट घेतली मात्र ही फाईल बांधकाम विभाग क्रमांक एक चे कार्यकारी अभियंता कदम यांच्या टेबलला पडून आहे असे समजल्यानंतर आनंद चंदनशिवे यांनी संताप व्यक्त केला अध्यक्ष कांबळे यांनी कदम यांना बोलावण्यात पाठवले असता कदम हे कार्यालयात नव्हते शेवटी झेडपीच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत चंदनशिवे अध्यक्ष कांबळे यांचे कार्यालय सोडून निघून गेले.















