सोलापूर- जिल्हा परिषदेत देशाच्या अमृत महोत्सवा निमित्त जिल्हा परिषदेच्या प्रशासक व मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करणेत आले. उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता खराडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मिरकले, जिल्हा कृषी अधिकारी वाघमोडे, लेखाधिकारी पाटील प्रमुख उपस्थित होते.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांचे पुजन सिईओ मनिषा आव्हाळे यांचे हस्ते करणेत आले. त्यानंतर सिईओ मनिषा आव्हाळे यांचे हस्ते ध्वजारोहण करणेत आले. शालेय विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत सादर केले. देशभक्तीपर पर घोषणांनी आसमंत दणाणून गेला.
शाळेतील विद्यार्थ्यांनी या वेळी देशभक्तीपर गीते सादर केली.
यावेळी सिईओ मनिषा आव्हाळे यांनी सर्व महिला कर्मचारी व पुरूष कर्मचारी यांची ओळख करून घेतली. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर जिल्हा परिषदेच्या आवारातील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या पुतळ्यांचे पुजन उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांचे हस्ते करणेत आले.