सोलापूर : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे (SC/ST commission) अध्यक्ष ज.मो.अभ्यंकर,(J. M. Abhyankar) सदस्य आर डी शिंदे, सदस्य के आर मेढे यांनी सोलापूर जिल्हा परिषदेत अनुसूचित जाती जमाती साठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेतला.
या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, इशाधिन शेलकांदे, कॅफो अजयसिंह पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शीतल जाधव, कार्यक्रम अधिकारी जावेद शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्कर बाबर, बांधकाम कार्यकारी अभियंता कदम, अजनाळकर, कोळी, पंडित भोसले, प्रकल्प संचालक स्मिता पाटील, कृषी अधिकारी कुंभार, पशुसंवर्धन अधिकारी डॉ नरळे यांच्यासह सर्व गटविकास अधिकारी यांची उपस्थिती होती.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना अभ्यंकर म्हणाले, जिल्हा परिषदेच्या आस्थापने सह कल्याणकारी योजनांचा आढावा घेण्यात आला एकंदरीत जिल्हा परिषदेचे कामकाज समाधानकारक वाटले, या वेळी वेगवेगळ्या सूचना देण्यात आल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना मध्ये लाभार्थ्यांना कृषी विषयक साहित्य तातडीने देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
सेवानिवृत्त प्रलंबित प्रकरणावर तातडीने निर्णय घेण्याची सूचना करण्यात आल्या असून ज्या दिवशी कर्मचारी सेवानिवृत्त होतो त्याच दिवशी त्याच्या हातात ग्रेच्युटीचा चेक मिळावा, सेवानिवृत्तीच्या सर्व फाईल त्याला द्याव्यात अशा विविध सूचना करण्यात आल्या असून या सर्वांचा अहवाल मागविण्यात आला आहे.


















