सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनगर येथील कार्यक्रमात शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार राबवत असलेल्या योजना तसेच सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना केलेली मदत याची माहिती दिली याचवेळी त्यांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या परिस्थितीवरून जिल्ह्यातील नेत्यांचे चांगलेच कान टोचले. कारखाने आणि बँका मी आणि शरद पवार यांनी चालवावेत का? या शब्दात त्यांनी नेत्यांना झापले. मी बोलतो म्हणजे अनेकांना पचत नाही कायतरी बोलतयं अशी टीका होते, जिल्हा मध्यवर्ती बँकेची अवस्था पाहता तुम्हाला विश्वस्त म्हणून पाठवले होते मालक म्हणून नाही. चूक शेतकऱ्यांची नाही तिथल्या संचालक मंडळाची असल्याचे त्यांनी सांगितले… पहा काय म्हणाले दादा


















