सोलापूर : दोन समाजात तेढ निर्माण करून दंगा होईल असे वक्तव्य करणाऱ्या भारत मनसावले तसेच हे वक्तव्य चॅनेलवर प्रसारित करणाऱ्या युट्युब चॅनलवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, भारत मनसावाले राहणार नई जिंदगी परिसर यांने दिनांक 24 सप्टेंबर 2022 रोजी एमआयडीसी परिसर सोलापूर या ठिकाणी यातील आरोपी भारत मंसावाले याने दोन व्हिडिओमध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने व दंगे घडून आणण्याच्या चेतावणी देणारे वक्तव्य केले व ते व्यक्तव्य भारत न्यूज या यूट्यूब चैनल वर प्रसारित केले आहे.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल संतोष वसंत गुळवे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्या अनुषंगाने एमआयडीसी पोलीस ठाण्यात भादवि कलम 153 व 153 अ प्रमाणे भारत मंसावाले व भारतरत्न न्यूज चॅनल युट्युब यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास एमायडिसी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक पेटकर हे करत आहेत.



















