सोलापूर : जिल्ह्यात पूर्वा नक्षत्राने सर्वत्र जोरदार हजेरी लावली आहे. दोन दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. मंगळवारी रात्री झालेल्या पावसात अक्कलकोट तालुक्यातील दुधनी मंडल व उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा मंडल विभागात अतिवृष्टी होऊन मंगळवारी रात्री सुमारे 65 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला.
दरम्यान जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी आवाहन केले आहे की, अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकऱ्यांनी आपल्या भागातील नुकसानीचे सूचना पत्र तहसील कार्यालयात भरून द्यावे. काय म्हणाले पहा शिंदे



















