सोलापूर– सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांच्या निवासस्थानी आज त्यांचे चिरंजीव आदित्यने बनविलेली पर्यावरण पूरक श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.यावेळी परिवारासह श्री गणेशाची आरती करण्यात आली. पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
स्वच्छ सर्वेक्षण आणि महापालिका माझी वसुंधरा आणि राष्ट्रीय स्वच्छ सोलापूर प्रशासनाच्या वतीने यंदा पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे.महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यानी शहरातील नागरिकांनी आपल्या घरी पर्यावरण पूरक गणेश मूर्ती प्रतिष्ठापना करून घरातच विसर्जन करावे, असे आवाहन केले. सोलापूर शहरातील तमाम नागरिकांना,मंडळांना गणेश उत्सवाच्या या वेळी आयुक्तांनी शुभेच्छा दिल्या.