सोलापूर : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्या स्वतः शनिवारी ही कामकाज करत असल्याचे चित्र पाहायला मिळते.
जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हटले की, त्यांना भेटण्यासाठी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून नागरिक येतात. अनेकांच्या अपेक्षा या सीईओ यांनाच भेटण्याच्या असतात त्यासाठी त्यांच्या कार्यालयासमोर बराच वेळ अभ्यासाची गर्दी असते. परंतु व्हिडिओ कॉन्फरन्स व बैठका यामुळे नागरिकांना भेटता येत नाही.
सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नागरिकांना भेटण्याची वेळ निश्चित केली आहे. त्यांनी पत्र काढले असून त्यामध्ये ग्रामस्थाना / नागरिकाना त्यांच्या समस्या, अडीअडचणी निराकरण होण्यासाठी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटण्यासाठी येत असतात. नागरिकांना/ ग्रामस्थाना त्यांचा वेळ वाया जाऊ नये यासाठी त्यांच्या समस्या तात्काळ सोडविण्यासाठी दररोज कार्यालयीन वेळेत आठवड्यातून कांही वेळ राखून ठेवणे गरजेचे असल्यामुळे नागरिकांना भेटण्यासाठी आता सोमवार ते शुक्रवार दु. ०१.०० ते दु. ०२.०० ची वेळ राखून ठेवण्यात (इतर शासकीय कामकाजातील वेळ उपलब्धतेनुसार) येत आहे.