सोलापूर : सोलापूर शहर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या गणेशोत्सवाची धूम आहे. या उत्सवानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रम होत आहेत. विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. परंतु एक अतिशय हटके असा कार्यक्रम सोलापूरच्या इंद्रधनु अपारमेंट मध्ये साजरा करण्यात आला. या इंद्रधनु अपार्टमेंट मध्ये अनेक राजकीय नेते, कार्यकारी अभियंता तसेच मोठे कॉन्ट्रॅक्टर, शासकिय कर्मचारी व अधिकारी राहतात. या ठिकाणी साजरा करण्यात येत असलेल्या गणेशोत्सवानिमित्त एक असा कार्यक्रम झाला की त्यामुळे मोठ्यांना आपल्या बालपणाची आठवण करून दिली.
इथे राहत असलेल्या मोठ्या मान्यवरांनी “नाच रे मोरा आंब्याच्या वनात” या लहान मुलांच्या गीतावर शालेय ड्रेस घालून उत्कृष्ट असा नृत्य केला, त्यामध्ये जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे यांनी मोर साकारला होता तर दुसरे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी हे दादा कोंडके च्या रूपात दिसून आले. तसेच या ठिकाणी राहत असणारे अनेक राजकीय नेत्यांनी सुद्धा लहान मुलांच्या ड्रेस मध्ये डान्स केला तो व्हिडिओ नक्कीच पाहण्यासारखा आहे.