सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या आणखी 10 कर्मचाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या कार्यवाहीचा दणका बसला आहे. त्यांची सेवा मुळ ठिकाणी वर्ग करण्यात आली आहे. एका महिन्यात सीईओ आव्हाळे यांनी दुसऱ्यांदा प्रतिनियुक्त्या रद्द केल्या असून यापूर्वी 20 जणांची प्रतिनियुक्तीवर रद्द केली होती.
या दहा कर्मचाऱ्यांमध्ये एस डी देशमुख माध्यमिक ते प्राथमिक, एस एस सुतार समाज कल्याण ते प्राथमिक, आर यू शेख माध्यमिक ते प्राथमिक, एस बी पाथरवट अक्कलकोट पंचायत समिती ते उत्तर सोलापूर, जे पी माने उत्तर सोलापूर ते अक्कलकोट, व्ही बी आहाळे मग्रारोहयो ते उत्तर सोलापूर, व्ही एच काटकर ग्रामपंचायत विभाग ते कुर्डूवाडी, एन एम कुलकर्णी ग्रामपंचायत विभाग ते मोहोळ, एम एस तलवार स्वीय सहाय्यक सीईओ ऑफिस ते पंचायत समिती अक्कलकोट, शिवानंद शेडजाळे मुख्य कार्यकारी अधिकारी निवासस्थान ते प्राथमिक आरोग्य केंद्र पाटकुल यांचा समावेश आहे.
कर्मचारी संघटना कडून मिळालेल्या माहितीनुसार समाज कल्याण विभागातील कनिष्ठ सहाय्यक लेखा शशी ढेकळे हे अनेक वर्षापासून तिथेच काम करत आहेत. मागच्या तीन वर्षापूर्वी बदली झाली होती, तेव्हा ही त्याला सोडले नाही, दरम्यान मे 2023 च्या बदल्या मध्ये शशी ढेकळे यांची बदली बार्शी येथे झाली असतानाही अजून पण त्यांना रीलीव्ह केले गेले नसल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे असे तर दुसरीकडे असे का? असा प्रश्न कर्मचाऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.