सोलापूर : राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक माहे जानेवारी २०२३ से डिसेंबर २०२३ मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, नव्याने स्थापित व सन २०२२ मध्ये झाल्यामुळे निवडणूका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायतीच्या (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणकप्रणालीव्दारे तसेच ग्रामपंचायत जागांच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपारिक पध्दतीने राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यातील 2296 ग्रामपंचायत पैकी सोलापूर जिल्ह्यातील 109 ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. यासह 50 गावांमध्ये पोटनिवडणूक होणार आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक ०६/१०/२०२३ (शुक्रवार)
नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ ( नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी)-दिनांक १६/१०/२०२३ (सोमवार) ते दिनांक २०/१०/२०२३ (शुक्रवार) वेळ स. ११.०० ते दु. ३.००
नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी)दिनांक २३/१०/२०२३ (सोमवार) वेळ सकाळी ११.०० वा. पासून छाननी संपेपर्यंत.
नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी)दिनांक २५/१०/२०२३ (बुधवार) दुपारी ३.०० वा. पर्यंत
निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ दिनांक २५/१०/२०२३ (बुधवार) दुपारी ३.०० वा. नंतर
आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक दिनांक ०५/११/२०२३ (रविवार) सकाळी ७.३० वा. पासून ते सायं. ५.३० वा. पर्यंत
मतमोजणी व निकाल घोषित करण्याचा दिनांक (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या | मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार राहील) दिनांक ०६/११/२०२३ (सोमवार) व नक्षलग्रस्त तसेच दुर्गम भागासाठी दिनांक ०७/११/२०२३ (मंगळवार)
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक दिनांक ०९/११/२०२३ (गुरुवार) पर्यंत