सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये सध्या कर्मचाऱ्यांच्या बिंदू नामावली तयार करण्याचे कामकाज सुरू आहे. दरम्यान खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघ तसेच संभाजी ब्रिगेडच्या वतीने यापूर्वी जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. शिक्षक बिंदू नामावली बाबत तक्रार करण्यात आली होती.
सोनापूर जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक बिंदू नामावली (मराठी माध्यम) मध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झालेली असून याबाबत आपण तात्काळ तक्रार निवारण सभा घेण्याचे आश्वासित केलेले होते तरी महोदयांनी खालील विषयाच्या अनुषंगाने काळ तक्रार निवारण सभा आयोजित करावी मागणी यावेळी करण्यात आली.
या निवेदनात शिक्षकांच्या निवड प्रवर्गामध्ये बदल करणे, शिक्षकांच्या मूळ जात प्रवर्गामध्ये बदल करणे, 2017 सालच्या चौकशी समितीनुसार कार्यवाही झालेली नाही अशा काही तक्रारी करण्यात आल्या होत्या.
शुक्रवार 25 ऑगस्ट रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांच्या दालनात बिंदू नामावली बाबत सुनावणी झाली. या बैठकीला खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघ तसेच संभाजी ब्रिगेड व सकल मराठा समाज असे पदाधिकारी उपस्थित होते. आव्हाळे यांच्यासमोर झालेल्या सुनावणी नंतर सर्वच समाधानी दिसून आले.
संभाजी ब्रिगेडचे पंढरपूर विभाग प्रमुख सचिन जगताप आणि सकल मराठा समाजाचे माऊली पवार यांनी अधिक माहिती देताना खुल्या प्रवर्गाच्या बिंदू नामावली बाबत सीईओ आव्हाळे या सकारात्मक दिसून आल्या असे सांगतानाच गुणवत्तेच्या आधारावर सर्व जातीतील खुल्या प्रवर्गाबाबत सीईओ यांनी निर्णय घेऊ अशी ग्वाही दिल्याने समाधान व्यक्त केले.