सोलापूर : जिल्हा परिषदेचे बांधकाम क्रमांक एकचे कार्यकारी अभियंता पी डी कदम व क्रमांक 2 चे कार्यकारी अभियंता अजनाळकर हे दोन्ही अधिकारी एकाच दिवशी म्हणजे 31 मे 2022 रोजी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्ती निमित्ताने जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात निरोप समारंभ कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे, उपअभियंता सुनील कटकधोंड, लेखाधिकारी मुल्ला, लेखाधिकारी राजगुरू, बिल्डर असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष दत्ता मुळे यांची उपस्थिती होती.
यावेळी कार्यकारी अभियंता कदम व अजनाळकर यांचा जिल्हा परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी अतिरिक्त सीईओ धोत्रे यांनी दोन्ही अभियंत्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषदेमध्ये बांधकाम विभागाचे कामकाज करताना अतिशय चांगल्या पद्धतीने या दोन्ही अभियंत्यांनी कामकाज केले कोणतीही तक्रार येऊ दिली नाही हीच त्यांच्या कामाची पावती असून याचे खरे तर मी समाधान व्यक्त करतो अशा भावना धोत्रे यांनी व्यक्त केल्या.
यावेळी चंचल पाटील, उत्तम सुर्वे, दत्ता मुळे यांनी ही कदम व अजनाळकर यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.