राज्यातील शासकीय रुग्णालयात झालेल्या मृत्यू तांडवास आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे जबाबदार असून निष्क्रिय आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन करण्यात आली. जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, शहर प्रमुख विष्णू कारमपुरी, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
जिल्हाप्रमुख बरडे यांनी सावंत यांच्यावर बोचरी टीका करताना एकीकडे आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे शासकीय आरोग्य विभागाचा गैरवापर करून संपूर्ण महाराष्ट्रात बोगस महाआरोग्य शिबिरे राबवितात. प्रत्यक्षात शासकीय रुग्णालयातील आरोग्य सेवांची मात्र बोंबाबोंब असून सावंत यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी केली.
यावेळी युवती सेनेच्या रेखा आडकी, विठ्ठल कुऱ्हाडकर, सुरेश शिंदे, संभाजी कोडगे, गुरुनाथ कोळी, गोवर्धन मुदगल, अक्षय चिलबेरी, श्रीनिवास बोगा, जर्गीस मुल्ला, शुभम कारमपुरी, अक्षय नंदाल, अजय कारमपुरी, नागमणी भंडारी, स्वाती शिंदे यांचा समावेश होता.