सोलापूर : जांबमुनी मोची समाज सेवा मंडळ सोलापूर शहर व जिल्हा यांच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जांबमुनी मोची समाज सेवा मंडळ सोलापूर शहर अध्यक्ष देवेंद्र भंडारे, श्री जांबमुनी रथोत्सव मध्यवर्ती समिती अध्यक्ष अशोक सायबोळू, समाजाचे युवक अध्यक्ष रतिकांत कमलापुरे, माजी महापौर संजय हेमगड्डी यांच्यासह शेकडो समाज बांधव या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
आंदोलनातून मोची समाजाच्या शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात प्रगतीसाठी लघुउद्योग करण्यासाठी भारताचे माजी उपपंतप्रधान बाबू जगजीवन राम आर्थिक विकास महामंडळ स्थापण करावे, १९५० पूर्वीचा जातीचा दाखला काढण्यासाठी जो पुरावा मागत आहेत तो कठिण समस्या आहे. त्यामुळे अनेक लोकांना नोकरीमध्ये शाळेमध्ये व्हॅलिडीटी (जात वैधता प्रमाणपत्र) मिळवण्यासाठी खुप अडचणी येत आहेत. तरी कृपया सदर १९५० पूर्वीचा पुरावा देण्याची अट शिथील करावी, स्व. करण म्हेत्रे यांच्या अत्यंविधी वेळी समाज बांधवाची पोलीस खात्याबरोबर कुठलाही वाद झाला नाही. कुठलीही तोडफोड झाली नाही. कोणतीही व्यक्ती जखमी झाली नाही. केवळ अत्यंविधी मध्ये मोठया प्रमाणात लोक सामिल झाले म्हणून जवळ जवळ २५० समाज बांधवांवर ३५३ कलमन्वये गुन्हा दाखल करणे चुकीचा आहे. तो त्वरीत रद्द करावा,
महाराष्ट्र राज्यामध्ये मोची, मादिगा, मादगी, मादर समाजाकरीता शासनाचे पडिक गायरान जमीन प्रत्येक कुटूंबाला ५ एकर मिळावी, मोची, मादिगा, मादगी, मादर समाजं मधील बेरोजगार युवक महिला करीता व केंद्र शासन व राज्य शासनाचा योजनाचे कर्ज व्यवसायकरीता त्वरीत कर्ज प्रकरण मंजूर करावे, महाराष्ट्रतील मोची, मादिगा, मादगी व मादर व मांग समाजातील ग्रामीण भागातील शेती असलेल्या लोकांना जिल्हा परिषदकडून शेती विषयक औजार, विहीर, विद्युत पंप कर्ज त्वरीत मिळावे अशा मागण्या समाजाने राज्य सरकारकडे केल्या आहेत.