सोलापूर : मराठा आरक्षणाचा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे येत्या पाच ऑक्टोबर रोजी सोलापुरात येणार आहेत त्या पार्श्वभूमीवर त्यांचे स्वागत आणि आरक्षण मेळाव्याची सोलापुरात जय्यत तयारी करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी शासकीय विश्रामगृह येथे सकल मराठा समाजाच्या वतीने बैठक घेण्यात आली. त्या बैठकीला सर्वपक्षीय मराठा समाजातील नेत्यांनी उपस्थिती लावली.
या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांचे छत्रपती संभाजी महाराज चौकात जंगी स्वागत करून तिथून मिरवणुकीने सर्व महापुरुषांना अभिवादन करत हुतात्मा स्मृती मंदिर या मेळाव्याच्या ठिकाणी यायचे. त्यानंतर दहा हजार लोक मेळाव्याला उपस्थित राहतील असे नियोजन करण्याचे ठरले. दरम्यान सकल मराठा समाज समन्वयक माऊली पवार यांनी या नियोजनाबाबत अधिक माहिती दिली.