सोलापुरात बुधवारी मध्यरात्री अचानक पाऊस आला. त्यावेळी उपोषणकर्ते कॉ.लक्ष्मण माळी व शहाबुद्दीन शेख त्या धो धो पावसात भिजत राहिले पण त्या ठिकाणाहून दुसरीकडे कुठे गेले नाहीत. गेल्या चार दिवसांपासन ते अन्नत्याग आंदोलन करत आहेत. कामगारांना बोनस मिळवून देण्यासाठी त्यांची जिद्द आणि क्रांतिकारी बाणा याचे दर्शन घडते. पोलीसांनी आग्रह केला की चला आपण पोलीस ठाण्यात मुक्काम करावे पण त्यांनी ते नाकारले. हे दोन्ही लढाऊ कार्यकर्ते वयाचे साठी पार केलेले आहेत. यामध्ये लक्ष्मण माळी बुवा जॉबर हे मधुमेह रुग्ण आहेत. यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कामगारांच्या प्रति लाल बावट्याची बांधिलकी कायम राखली आहे.