सोलापूर : राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांचे सोलापुरात नुकतेच आगमन झाले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष पवार, युवक अध्यक्ष जुबेर बागवान यांच्यासह कार्यकर्त्यांनी मंत्री मुश्रीफ यांचे अतिशय जल्लोषामध्ये स्वागत करत त्यांचा सत्कार केला.
देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सोलापूरचे शासकीय ध्वजारोहण उद्या होत आहे त्या निमित्ताने ते मुक्कामी सोलापूरला आले आहेत. दरम्यान पत्रकारांशी बोलताना ते काय म्हणाले पहा…