सोलापूर राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांची अखील भारतीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत कायम निमत्रीत म्हणून तसेच सोलापूर शहराचे लोकप्रिय आमदार प्रणिती शिंदे यांचीही राष्ट्रीय कार्यकारणीत विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड झाल्याने सोलापूर शहर जिल्हा शाखेच्या भीमशक्तीच्या वतीने पार्क चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयासमोर लाडू वाटप करून मोठा जल्लोष करण्यात आला.
यावेळी शहर अध्यक्ष उमेश सुरते, प्रदेश उपाध्यक्ष नागेश बंगाळे, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस राजाभाऊ कदम व जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी प्रमिला तुपलोंढे यांच्या हस्ते लाडू वाटप करण्यात आले याप्रसंगी डॉ. खारवे, के.एम कांबळे, डी बी मस्के, अशोक इंगळे, जितेंद्र व्हटकर, शेख भैय्या, प्रबोध कदम, सोन्या कांबळे, विपूल प्रतीक कदम, सतीश इंगळे त्याचप्रमाणे महिला आघाडीच्या संध्या काळे, सुमन लोढे, अँड. बागवान, सुमन जाधव, लता सोनकांबळे, शोभा बोबे, मुमताज तांबोळी, मुमताज शेख, रवीप्रभा लोंढे, अनिता भालेराव, सुनिता बेरा, संघमीत्र चौधरी, यासीर बागवान, दौला शेख, अविनाश मोरे, जितेंद्र इंगळे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.