सोलापूर जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशन ग्रामीण पाणी पूरवठा विभागातील दोन टेंडर क्लार्क यांना कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी सीईओ मनीषा आव्हाळे यांनी निलंबीत केल्याची माहीती मिळाली आहे. अनिल पाटील ,शामसुंदर समदुरले अशी निलंबीत करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
सीईओ मनीषा आव्हाळे यांनी पदभार घेतल्यानंतर केवळ एका महिन्याच्या आतच पहिला दणका दिला आहे. जलजीवन मिशन ही मोठी आणि लोकोपयोगी योजना असल्याने त्यांनी जल जीवन मिशनच्या कामकाजावर विशेष लक्ष त्यांनी केंद्रीत केले आहे. जलजीवनच्या कामकाजात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जिल्हा नियोजन सभेत आ.सुभाष देशमुख यांनी केला होता. यासह इतर आमदारांनी आवाज उठवला होता. या आरोपावर चौकशी समिती नेमण्यात आली होती.
कामकाजात अनियमिता झाल्याचा ठपका त्यांनी ठेवला होता. दरम्यानच्या काळात मनीषा आव्हाळे यांना प्रभारी सीईओ पदी कार्यरत असताना त्यांनी युद्ध पातळीवर प्रलंबीत जलजीवनचे कामे मार्गी लावले होते.
अनिल पाटील आणि शामसुंदर ग्रा.पा.पू .कार्यरत असताना कर्तव्यात कसूर केल्याचे आढळून आल्याने त्यांना निलंबीत करण्यात आले आहे. अनिल पाटील हे बदलीने शिक्षण (माध्य) तर समदुरले हे बांधकाम (२) येथे कार्यरत आहेत.