सोलापूर : एमआयएम पक्षाच्यावतीने शहराध्यक्ष फारुक शाब्दी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर नळपट्टीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी महापालिकेने दिलेल्या कर पावत्या जाळून निषेध नोंदवण्यात आला.
या आंदोलनात सरचिटणीस कोमारो सय्यद, माजी नगरसेवक गाझी जहागीरदार, अझहर हुंडेकरी, इसामुद्दीन पिरजादे, वाहेदा भंडाले, नसीमा कुरेशी, मोईन शेख, याकूब एम आर, मुस्ताक कानकुर्ती, राजा बागवान, इब्राहिम लालकोट, कमरुल शेख, मोसिन मैंदर्गी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
यावेळी अध्यक्ष फारूक शाब्दी, कोमारो सय्यद, अझहर हुंडेकरी यांनी महानगरपालिकेच्या कारभाराचा निषेध नोंदवला ज्यांच्या घरात नळ नाही अशांना नळपट्टी पावत्या आलेल्या आहेत असे सांगतानाच विविध विषयांवर लक्ष वेधत महापालिका आयुक्त या हा विषय गांभीर्याने घेतील अशी अपेक्षा आहे अन्यथा एमआयएम पार्टी यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडले असा इशारा देण्यात आला.