महाराष्ट्र सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधामध्ये जुळे सोलापूर येथील मराठा समाजाने अनोख्या पद्धतीने आज आंदोलन केले. यामध्ये एका मुलाला जेलमधील पोशाख घालून आणि छगन भुजबळ यांचा मुखवटा घालून प्रतिकात्मक छगन भुजबळ उभा करून त्यांच्या हातात बेड्या आणि एक ताट देऊन त्यामध्ये झुणका भाकरी हे खाद्य देऊन छगन भुजबळ यांच्या विरोधात घोषणाबाजी घोषणाबाजी करण्यात आली.
महाराष्ट्र हा शांतता प्रिय राज्य असून महाराष्ट्रातील शांतता व ऐक्य बिघडवण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली छगन भुजबळ हे महाराष्ट्रभर करत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी ओबीसी समाजातील सामान्य नागरिक यांचा सुद्धा पाठिंबा असताना मराठा समाजाच्या विरोधात आणि मनोज जरंगे पाटील यांच्या विरोधात प्रक्षोभक भाषणे करून महाराष्ट्रातील शांतता सुव्यवस्था बिघडवण्याचा काम छगन भुजबळ करीत आहेत.
यासाठी त्यांच्या विरोधात जुळे सोलापूर येथील मराठा समाजाने अनोख्या पद्धतीने आंदोलन करून एक प्रकारे सरकारलाच इशारा दिला की समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये शांतता सुव्यवस्था बिघडवणारा तुमचाच मंत्री आहे त्याला तुम्ही वेळीच आवर घाला अन्यथा मराठा समाज यापेक्षाही उग्र आंदोलन भविष्यामध्ये करेल आणि यासाठी सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्रातील हे सध्याचे सरकार असेल असा इशारा देण्यात आला.