माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त, जेष्ठ नेत्या उज्वला शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, सोलापूर शहराध्यक्ष चेतन नरोटे, जिल्ह्याचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे शिंदे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी साहेबांच्या हस्ते केक कापण्यात आला.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे हे कधीच आपला वाढदिवस सार्वजनिक स्वरूपात साजरा करत नाहीत परंतु यंदा त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या सोबत पहिल्यांदाच आपला वाढदिवस परिवारासोबत साजरा केला.
आपल्या साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी सोलापूरहून आवर्जून सोलापुर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, माजी नगरसेवक विनोद भोसले, प्रवक्ते अशोक निंबर्गी, सुशील बंदपट्टे, रमेश व्हटकर, राज सलगर, रूपेश गायकवाड़, शंकर नरोटे, जयप्रकाश पोल, मंजूनाथ पोल, शाहु सलगर, ओंकार सुरवसे हे कार्यकर्ते मुंबईला गेले होते. त्यांनी गौतम अपार्टमेंट मुंबई येथे सुशीलकुमार शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच त्यांच्या हस्ते केक कापुन वाढदिवस करण्यात आला. साहेबांनी आपल्या शुभेच्छा स्वीकारल्याबद्दल सोलापूरच्या नेत्यांच्या आनंदी चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहत होता.