सोलापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्रमांक एक च्या वतीने सर्वसाधारण सभेत झालेल्या मंजुरी प्रमाणे जिल्हा परिषद पतसंस्था क्रमांक एक च्या सदस्यांना श्रावणी गौरी गणेशोत्सवानिमित्ताने वाढीव तातडीचे कर्जाचे वाटप शुभारंभ मनीषा आव्हाळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी प्राथमिक स्वरूपात पाच सभासदांच्या सभासदांना 30000 रुपयांचे वितरण करण्यात आले ,. याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन स्मिता पाटील उपस्थित होत्या.यामध्ये सदस्य गिरीश जाधव, अनुपमा रांजणे, बाबुराव सुतार, संजय कोळी , गोरखनाथ मस्के आदिना वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेअरमन विवेक लिंगराज यांनी केले. याप्रसंगी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन सुहास चेळेकर, जेष्ठ संचालक श्रीशैल्य देशमुख, तज्ञ संचालक डॉ. एस.पी माने, दत्तात्रय घोडके, दीपक घाडगे, अनिल जगताप, शेखर जाधव, शहाजहान तांबोळी ,विष्णू पाटील, धन्यकुमार राठोड, हरिबा सपताळे, सुंदरराव नागटिळक, सुनंदा यादगिरी, मृणालिनी शिंदे, त्रिमूर्ती राऊत, सचिव दत्तात्रय देशपांडे उपस्थित होते.