सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्या जोरदार वक्तृत्व शैलीने अनेक मोठमोठी पदे तसेच राज्याचे मंत्रिपद भोगलेल्या लक्ष्मणराव ढोबळे यांना भारतीय जनता पार्टीने आता विरोधकांवर तोफ डागण्यासाठी सोडून दिले आहे.
प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांना भारतीय जनता पार्टीने प्रदेश प्रवक्ते पदी निवड केली आहे. या निवडीचे पत्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ढोबळे यांना देण्यात आले. भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रथमच प्राध्यापक ढोबळे यांना भाजपने प्रदेशाचे प्रवक्ते पद दिले आहे. पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीमध्ये ढोबळे यांनी आमदार समाधान आवताडे यांच्या विजयामध्ये प्रचारात मोठा वाटा उचललाच पाहायला मिळाले होते.