सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस मधून अजित पवार हे बाहेर पडल्यानंतर शरद पवार यांनी पक्ष संघटन बांधणीला महत्त्व दिले आहे. त्यामुळे आता नव्याने पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या जात आहेत. त्यात सोलापूर शहर युवक अध्यक्ष पदासाठी चांगलीच चुरस निर्माण झाल्याचे पाहायला मिळते.
सोलापुरातील हॉटेल व्यवसायिक नजीब शेख, सरफराज शेख यासह अक्षय वाकसे या तीन युवकांमध्ये सध्या चढाओढ पाहायला मिळत आहे.
नुकताच शरद पवार हे सोलापूर दौऱ्यावर येऊन गेले तेव्हा या तीनही युवकांनी आपले शक्ती प्रदर्शन करत लक्ष वेधून घेतले होते.
रविवारी पुण्यामध्ये कार्यकर्त्यांच्या शिबिर संपन्न झाले. या शिबिराला स्वतः शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह प्रदेश युवक अध्यक्ष मेहबूब शेख असे अनेक नेते उपस्थित होते.
सोलापुरातून मुस्लिम समाजातील काही ज्येष्ठ मान्यवर यांचे शिष्टमंडळ पुण्याला गेले असल्याची माहिती मिळाली. या शिष्टमंडळामध्ये विशेष करून सोलापूर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शकील मौलवी यांची उपस्थिती होती.
सोशल बँकेचे मैनोद्दिन चेअरमन, महीबुबभाई, कलीम तुळजापूरे, जाकिर नाईकवाडी अशा ज्येष्ठ मान्यवरांच्या समावेश असल्याचे फोटोवरून दिसून आले. हे सर्व नजीब शेख यांच्या समर्थनार्थ गेल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे.
या शिष्टमंडळाने सुरुवातीला शरद पवार त्यानंतर प्रदेश युवक अध्यक्ष महबूब शेख यांची भेट घेतली. एकूणच या शिष्टमंडळात काँग्रेस पक्षाचे शकील मौलवी यांची उपस्थिती ही आता नव्या चर्चेला तोंड फोडणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.