सोलापूर : धनगर समाजातील युवक शेखर बंगाळे याने धनगर समाजाच्या आरक्षणाकडे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देतानाच त्यांच्या अंगावर भंडारा उधळला. तत्पूर्वी शेखर बंगाळे हा वादग्रस्त असल्याने पोलिसांनी त्याला आत जाऊ दिले नाही परंतु भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी बंगाळे याला स्वतःच्या जबाबदारीवर आत नेले, आणि नंतर हा प्रकार घडला.
या प्रकारानंतर चौथाळलेल्या भाजप शहराध्यक्ष काळे यांनी बंगाळे याला मारहाण केली ते व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत आणि काळे यांच्यावर ही धनगर समाजातून टीका केली जात आहे. दरम्यान आपली प्रतिक्रिया देताना नरेंद्र काळे काय म्हणाले पहा…