सोलापूर दि.४ :- येत्या मकर संक्राती सणासुदीला हातमाग विणकर कुटुंबाना प्रतिमहा 200 युनिट पर्यंत मोफत विज देणे. प्रती पुरुष विणकर रु. 10,000 आणि महिला विणकरांना रु. 15,000 उत्सव भत्ता देण्यात येईल असे जाहीर केले आहे. राज्यात इतर उत्पादने घेणा-या हातमाग विणकरांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे हा भत्ता संपूर्ण महाराष्ट्रात हातमागावर विविध उत्पादने तयार करणा-या सर्वच हातमाग विणकर व कारांगीरांना लागू करावा.
सोलापूर शहर व जिल्ह्यात हातमागावर विविध उत्पादने तयार केली जातात. या उत्पादनांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. परंतु या उत्पादनांत अत्यल्प मजूरी मिळत असल्याने अनेक विणकरांकडे उत्कृष्ठ कौशल्य असून देखील इतर रोजगाराकडे वळावे लागत आहे. हा सण भत्ता लागू केल्यास ही मंडळी आनंदाने पुन्हा हातमागावर काम करण्याकडे वळतील. पुढची पिढी देखील या क्षेत्रात टिकून राहील. अशी मागणी ज्येष्ठनेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली असता येत्या चार दिवसात शासन निर्णय जाहीर करून वस्त्रोद्योग धोरणाची अंमलबजावणी करण्याचे ठोस आश्वासन दिले.
मंगळवार दि. ३ ऑक्टोबर २०२३ रोजी मंत्रालय येथे राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना प्रत्यक्ष भेटून महाराष्ट्र शासनाने वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले असून या योजनेतील तरतुदींची अंमलबजावणी करण्यासंबंधी निवेदन दिले.