सोलापूर : सात महिन्यानंतर सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी घेण्यात आली. या बैठकीला सोलापूर शहरातील भाजपचे आमदार सुभाष देशमुख व आमदार विजयकुमार देशमुख हे दोन्हीही गैरहजर होते. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांची उपस्थिती होती. सभागृहामध्ये पाणी टंचाईवर बराच वेळ चर्चा झाली. त्यानंतर आमदार प्रणिती शिंदे या उठल्या, त्यांनी सोलापूर शहरातील दोन्ही देशमुख आमदार आज उपस्थित नाही त्यामुळे शहराचा प्रश्न मलाच मांडावा लागेल असे म्हणतात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्या दोघांनीही मला सांगितले आहे, म्हणून ते उपस्थित नाहीत असे म्हणून सावरून घेतले.
यावेळी प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहरातील पाण्याचा प्रश्न आवाज उठवताना, सोलापूर शहराला अजूनही आठ दिवसाला एकदा पाणीपुरवठा होतो प्रशासनाचे नियोजन शून्य आहे त्यामुळे अशा टंचाई परिस्थितीमध्ये सोलापूर शहराला सुरळीत पाणीपुरवठा करावा, गढूळ पाणीपुरवठा होऊ नये, पाणी स्वच्छ मिळावे आणि नळ नसताना महानगरपालिका त्या नागरिकांना बिले कशी दिली? असे प्रश्न उपस्थित करत आमच्या सरकार वेळी आणि टंचाई असताना देखील दोन दिवसाआड पाणीपुरवठा केल्याचे सांगत महापालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.
महापालिकेच्या आयुक्त शितल तेली उगले यांनी पाणीपुरवठा नियोजनातील अडथळे आणि महापालिकेला येणाऱ्या अडचणी सांगितल्या. यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांच्या बरोबर शहरातील विरोधी पक्षातील नियोजन समिती सदस्य अमोल शिंदे यांनी पाणी प्रश्नावर आवाज उठवला. पहा संपूर्ण व्हिडिओ…