Tuesday, September 22, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

धक्कादायक! सोलापूरच्या दोघा मित्रांचा टेंभुर्णीजवळ अपघातात जागीच मृत्यू ; एकाचा सिव्हील हॉस्पिटलमध्ये मृत्यू ; पुण्यावरून ट्रिपल सीट येत होते

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
4 May 2023
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापूर शहरासाठी एक हृदयद्रावक घटना घडली असून दोघा मित्रांचा अपघातात मृत्यू झाला आहे. टेंभुर्णी जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीवर येणाऱ्या दोघांचा अपघात झाला आणि अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या अपघातात एक तिसरा युवक गंभीर जखमी असून त्याच्यावर सोलापूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती टेंभुर्णी पोलिसांकडून मिळाली घटनेची माहिती मिळताच नातेवाईक सोलापुरातून टेंभुर्णीकडे रवाना झाल्याचे समजते.

तेजस सुरेश इंडी वय 20 राहणार मिलन अपार्टमेंट भवानी पेठ, लिंगराज शिवानंद हाळके वय 24 राहणार भवानी पेठ हे दोघे जागीच ठार झाले तर गंभीर जखमी झालेला गणेश शरणप्पा शेरी हा सुद्धा सिव्हील हॉस्पिटल मध्ये उपचार घेताना त्याचा मृत्यू झाला असे सांगण्यात येत आहे. या युवकांच्या मित्रांनी आपल्या फेसबुक वर पोस्ट टाकून त्यांना श्रद्धांजली वाहिल्याचे दिसत आहे.

मयत तिघे मित्र हे एम एच 13 डी झेड 9826 या एकाच दुचाकीवरून सोलापूरहुन पुण्याकडे  निघाले होते. बुधवारी मध्यरात्री ते अरण जवळ आले असता एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली आणि त्या अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याचे माहिती मिळत आहे. मध्यरात्री उशिरा जेव्हा पोलीस पथक गस्त घालण्यासाठी गेले असता त्यांना हा अपघात झाल्याचे दिसून आले, तोपर्यंत या दोघांचा मृत्यू झाला होता पोलिसांनी तातडीने टेंभुर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्या दोन्ही मृतदेहांना ठेवण्यात आले आहे अशी माहिती मिळत आहे. तिसरा जखमी गणेश शेरी यास सिव्हील हॉस्पिटल कडे पाठवण्यात आले होते परंतु त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला असे सांगण्यात आले. या अपघात प्रकरणी किरण सुभाष इंडी यांनी टेंभुर्णी पोलिसात फिर्याद दिली असून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे तपास साहेब पोलीस निरीक्षक जोग हे करीत आहेत.
SendShareTweetSend
Previous Post

शेतकऱ्यांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत महत्त्वाची बातमी वाचा ; आता बँक खाते…..

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार दोन दिवस सोलापुरात ; एक दिवस शहरात मुक्कामी ; असा आहे दौरा कार्यक्रम

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार दोन दिवस सोलापुरात ; एक दिवस शहरात मुक्कामी ; असा आहे दौरा कार्यक्रम

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000741
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group