सोलापूर : येथील अरविंद धाम पोलीस वसाहतीमध्ये राहणाऱ्या एका 16 वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास उघडकीस आली आहे.
पृथ्वीराज गणपतसिंग चव्हाण असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. मंगळवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास अरविंद धाम पोलीस वसाहती मधील ब्रह्मपुत्र इमारत क्रमांक एक पाचव्या मजल्यावरील रूम नंबर 42 मध्ये घरातील सिलिंग फॅनला कपड्याच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत नातेवाईकांना मिळून आला. त्यास बेशुद्ध अवस्थेत फौजदार चावडी पोलिसांनी सिविल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याबाबत सिव्हिल पोलीस चौकीतील डायरीमध्ये नोंद झाली आहे.