सोलापूर : दक्षिण सोलापूर येथील 70 शाळांना लोकमंगल फौंडेशनच्यावतीने पर्यावरण पूरक सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशीनचे वाटप आ.सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या मशीनचा वापर सगळ्या शाळांमध्ये करण्यात यावा असे त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील शाळा समृद्ध होण्यासाठी व विद्यार्थ्यांना चांगले डिजिटल शिक्षण देण्यासाठी ज्या गोष्टींची गरज असेल अशा गरजांची यादी करून त्या शाळेने 8 दिवसात अर्ज करावे असे आवाहनही यावेळी देशमुख यांनी केले.
याप्रसंगी लोकमंगल बँकेचे संचालक व लोकमंगल फाउंडेशनचे हितचिंतक प्रल्हाद कांबळे यांनी उपस्थित असलेल्या शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या व याचे औचित्य साधून लोकमंगल फाउंडेशनच्या माध्यमातून शाळेच्या शिक्षकांनी आपल्या शाळेच्या परिसरात पाच खड्डे करावे व फाउंडेशनला कळवावे अशा शाळांमध्ये फाउंडेशनच्या माध्यमातून वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनासाठी उपक्रम राबविण्यात येईल असे सांगितले..
या कार्यक्रमास ग्लेनमार्क कंपनीचे बेलदार यांनी सीएसआर फंडातून हे मशीन उपलब्ध करून देण्यामागचे कारण आपल्या मनोगतातून व्यक्त केले. यावेळी सुयेश गुरुकुल चे मुख्याध्यापक केशव शिंदे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. मेतन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश मेतन यांनी विद्यार्थिनींना पिरेडसमध्ये येणार्या समस्या आणि शाळांमध्ये सॅनिटरी पॅड डिस्पोजेस मशीन वापरण्याचे फायद सांगितले. आभार प्रदर्शन मेतन फाउंडेशनचे सदस्य सोमेश्वर लवंगे यांनी केले.