सोलापूर : दुष्काळी यादीतून वगळलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्याला दुष्काळी यादीत समाविष्ट करा आणि 2022 साली सप्टेंबर- ऑक्टोबर मध्ये झालेल्या दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाईची अनुदान रक्कम द्यावी या दोन प्रमुख मागण्याचे निवेदन माजी आमदार दिलीप माने यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिले.
यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची शेतकऱ्यांशी बोलताना सकारात्मक भूमिका दिसून आली. शासनाच्या निकषात दक्षिण तालुका बसलेला नाही मात्र मी कृषी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तालुक्याला दुष्काळी यादीत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव पाठवतो आपणही पाठपुरावा करावा अशी भूमिका व्यक्त केली.
दिलीप माने यांनी एकूणच परिस्थितीचा आढावा सांगताना येत्या 15 दिवसात निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
गंगाधर बिराजदार यांनी तालुक्यात एवढी मोठी दुष्काळी प्रसिद्ध असताना या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी कुठल्या धुंदीत मग्न आहेत असा सवाल उपस्थित केला.
यावेळी चंद्रकांत खुपसंगे, गंगाधर बिराजदार, निखिल देशपांडे, प्रथमेश पाटील, राम गायकवाड, अनिल जाधव, आनंद आंत्रोळीकर, विकास पाटील, सुनील जाधव, उमेश भगत, श्रीकांत मेलगे, जयकुमार जगताप, पिरसाब हवालदार, लता जाविर, गणपत बचुटे, युवराज राठोड, मालाजी पाटील, किरण बंडगर, सुदर्शन पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.