सोलापूर : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी केवळ अडीच महिन्यात जिल्हा परिषद प्रशासनाला शिस्त लावण्याचे काम केले आहे. प्रतिनियुक्तीवर असलेल्या वीस कर्मचाऱ्यांना त्यांनी तात्काळ पूर्वपदावर पाठवून दिले त्यानंतर पुन्हा दहा जणांची प्रतिनियुक्ती रद्द केली. जल जीवन मिशनच्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले. त्यांच्या शिस्तीचा धसका जिल्हा परिषदेतील सर्वांनीच घेतला आहे.
परंतु असे अनेक कर्मचारी आहेत की त्यांच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांचे लक्ष नाही.
समाज कल्याण विभागातील कनिष्ठ सहाय्यक लेखा शशी ढेकळे हे अनेक वर्षापासून तिथेच काम करत आहेत. मागच्या तीन वर्षापूर्वी बदली झाली होती, तेव्हा ही त्याला सोडले नाही, दरम्यान मे 2023 च्या बदल्या मध्ये शशी ढेकळे यांची बदली बार्शी येथे झाली असतानाही अजून पण त्यांना रीलीव्ह केले गेलेले नाही. शशी ढेकळे हे कार्यालयात कमी आणि फिरतीवर जास्त असल्याची चर्चा आहे. लाभाची कामे करण्यात मशगुल असतात, अशा त्यांच्या तक्रारी समोर आल्या आहेत.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी या कर्मचाऱ्याबाबत समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांना विचारणा केली असता त्यांनी असे उत्तर दिले की कोहिनकर सुद्धा आवक झाले ! “साहेब शशी ढेकळे हा गेल्यास समाज कल्याण कार्यालयाला कुलूप लावावे लागेल” या संयस्यास्पद वक्तव्यावरून ढेकळे यांनी स्वतःचे किती महत्त्व समाज कल्याण विभागात वाढवले आहे याचा प्रत्यय येतो.
सीईओ आव्हाळे यांनी प्रतिनियुक्ती रद्द केलेल्या मध्ये बांधकाम क्रमांक एक मधून पूर्वपदावर अक्कलकोट पंचायत समिती येथे एस के पोद्दार यांचा समावेश होता. परंतु केवळ एक महिन्यातच पोतदार हे पुन्हा प्रतिनियुक्तीवर अक्कलकोट पंचायत समिती येथून ग्रामीण पाणीपुरवठा मुख्यालय येथे आले आहेत. या एकाच कर्मचाऱ्यावर प्रशासन इतके मेहरबान का? असा प्रश्न आता इतर कर्मचारीही उपस्थित करत आहेत.