सोलापूर : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील कामगिरीचे स्मरण करुन देण्याबरोबरच नव्या सावरकरांच्या विचाराची ओळख करुन देण्यासाठी शहर दक्षिण मतदार संघात भाजपाच्यावतीने आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. सावरकरप्रेमी मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी झाले होते. स्वातंत्र्य वीर सावरकर जी का अपमान नहीं सहेगा हिंदुस्थान”,सावरकर जी के सन्मान मैं,भाजपा मैदान मैं, आम्ही सारे सावरकर या घोषणांनी भाजप कार्यकर्त्यांनी विजापूर रोड परिसर दणाणून सोडला होता.
या गौरव यात्रेत सोलापूरचे लोकसभा खासदार डॉ जयसिद्धेश्र्वर महास्वामी, दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख, शहर अध्यक्ष विक्रम देशमुख, युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मनीष देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती. राहुल गांधी यांच्याकडून वारंवार होत असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाविरोधात भाजपच्या वतीने सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आह. रविवारी शहर मध्य मतदारसंघातून गौरव यात्रा काढण्यात आली होती तर मंगळवारी शहर दक्षिण मतदार संघातून ही गौरव यात्रा काढण्यात आली.
स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाचे स्मरण या गौरव यात्रेत करण्यात आले.
नेहरू नगर ते छत्रपती संभाजी तलाव या मार्गावर ही यात्रा काढण्यात आली. यात्रेचा समारोप छत्रपती संभाजी महाराज तलाव येथील गार्डन येथे अरविंद जोशी यांच्या मनोगताने करण्यात आला. यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी यापुढे सावरकरांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही असे सांगितले. यात्रेत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती व याच बरोबर अनेक तरुण युवक देखील, मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सावरकर गौरव यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. या यात्रेत सहभागी झालेल्या सर्वांनी सावरकरांचे मुखवटे चेहऱ्यावर लावले होते. युवकांनी भगव्या टोप्या आणि शेले परिधान केले होते.
यावेळी सोलापूर शहर सरचिटणीस शशी थोरात, चिटणीस डॉ. शिवराज सरतापे, सोमनाथ केंगनाळकर, भाजपा दक्षिण पश्चिम मंडल अध्यक्ष महेश देवकर, दक्षिण पूर्व मंडल अध्यक्ष श्री शिवशरण बब्बे, अरविंद जोशी, भाजपा महिला आघाडी शहराध्यक्षा इंदिरा कुडक्याल,विजया वड्डेपल्ली, नगरसेविका राजश्री चव्हाण,अश्विनी चव्हाण,मेनका राठोड, संगीता जाधव, विजयालक्ष्मी पूरुड, राजश्री बिराजदार-पाटील, मनीषा हुच्चे शहरातील विविध भाजपा आघाडी आणि सेल चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.