दोन वेळा प्रभारी, आता पूर्ण वेळ पदभार ; सुनील नंतर आले संजय ; जिल्हा परिषदेच्या या विभागाला कार्यकारी अभियंता
सोलापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला आता पूर्ण वेळ कार्यकारी अभियंता मिळाला असून संजय धनशेट्टी हे सोमवारी जॉईन झाले आहेत. पदभार घेतल्यानंतर त्यांनी सीईओ मनीषा आव्हाळे यांची भेट घेतली.
सोमवारी उपअभियंता सुनील कटकधोंड यांच्या कडून कार्यकारी अभियंता धनशेट्टी यांनी पदभार घेतला. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील जलजीवन मिशन या योजनेचे मोठे काम आहे, त्याची सर्व कामे वेळेवर पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न राहील, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ही योजना असल्याने प्रत्येकाच्या घरी पाणी पोहोचले पाहिजे याला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले.
जिल्हा परिषदेत धनशेट्टी यांच्याकडे 21 जुलै 2007 ते 31 ऑगस्ट 2007 आणि 17 जून 12 ते 23 मार्च 13 प्रभारी चार्ज राहिला आहे. जिल्हा परिषदेत काम करण्याचा दांडगा अनुभव त्यांच्याकडे आहे.
धनशेट्टी हे प्रथम ठाणे जिल्हा परिषद शाखा अभियंता म्हणून रुजू झाले. त्यानंतर ग्रामीण पाणी पुरवठा विभाग उपअभियंता सांगोला, पुढे अक्कलकोट उपअभियंता, 23 जून 2014 गडचिरोली येथे बदली करण्यात आली. 5 फेब्रुवारी 2016 रोजी ते सोलापूर महापालिका मध्ये उपअभियंता पदावर रुजू झाले तिथे सार्वजनिक आरोग्य अभियंता पदावर चार वर्ष कामकाज केले आता सोलापूर जिल्हा परिषदेत प्रमोशनने कार्यकारी अभियंता पदावर रुजू झाले आहेत.