जिल्हा परिषद कर्मचारी युनियन भेटले उपमुख्मंत्री अजित पवारांना ; पवारांचे आश्वासन
राज्यातील जिल्हा परिषंदांच्या लिपीकांच्या शासन स्तरावर प्रलंबित मागण्यासाठी युनियनचे राज्याध्यक्ष बलराज मगर आझाद मैदान मुंबई येथे नियोजित असलेल्या आत्मक्लेश आंदोलनाबाबत निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार यांना आ. संजयमामा शिंदे यांच्या माध्यमातून राज्य सरचिटणीस लिंगराज, डॉ. एस .पी. माने, श्रीशैल्य देशमुख आदींनी लिपिक, लेखा, आरोग्य वाहन चालक, परिचर यांच्या वेतन त्रुटी बाबत ग्रामविकास विभागास सूचना देण्यात यावे असे निवेदन सोलापूर येथे देण्यात आले.
1)जिल्हा परिषदामधील लिपीक वर्गीय कर्मचा-यांच्या वेतन श्रेणीत दि.01.01.2016 पासून सुधारणा करणे, तसेच अन्य संवर्गातील म्हणजेच लेखा,परिचर, वाहन चालक व आरोग्य विभागातील काही संवर्गाच्या कर्मचा-यांच्या वेतनश्रेणीतील तफ़ावती दूर करणे.
2)लिपीक वर्गीय कर्मचा-यांच्या पदोन्नती स्तर कमी करणे विषयी नियुक्त समितीच्या अहवालावर आमच्या संघटनेकडून चर्चा होऊन अंतिम निर्णय घेणे.
3)जिल्हा परिषदेमधील सर्व संवर्गाची रिक्त पदे पदोन्नतीने भरणे शिवाय परिचर व वाहन चालक या संवर्गाच्या सेवा भरती नियमात दुरुस्ती होऊन सदरची रिक्त पदे भरणे.
याशिवाय 1 तारखेला सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन होणे, सर्व संवर्गातील कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, सुधारीत कर्मचारी आकृतीबंध मंजुर करावा, लिपीक वर्गीयांचे पदोन्नतीचे स्तर कमी करावे,अर्थात यावेळी मंजुर असलेल्या लिपीकांच्या पदामध्ये कपात करण्यात येऊ नये व जर कोणत्या पदाची कपात होणार असेल त्यांचे समायोजन व इतर बाबीवर चर्चा होणे आवश्यक आहे. याशिवाय परिचर व वाहन चालक यांना पदोन्नती मिळावी यासाठी शासनाच्या मुख्य सचिवांच्या यापुर्वीच निर्गमित केलेल्या अधिसुचना प्रमाणे 40-10-50 अशा पध्दतीने सेवा भरती नियमात दुरुस्ती करावी,महाराष्ट्र विकास सेवा श्रेणीच्या नियमात संघटनेने मागणीकेल्यानुसार बदल करावा.या व अशा प्रमुख प्रलंबित मागण्या शासनाकडे यापुर्वीच सादर केलेल्या आहेत.
तरी वरिल मागण्याचे अनुषगाने ग्रामविकास विभागास सुचित केले जाईल असे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार यांनी शिष्टमंडळला आश्वासित केले. निवेदनावर राज्याध्यक्ष बलराज मगर, कार्याध्यक्ष बाबुराव पुजरवाड, राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज, कोषाध्यक्ष विजयकुमार हळदे, बजरंग संकपाळ, राम मडकी यांच्या स्वाक्षरी आहेत.