युवराज जाधव काँग्रेसच्या भटक्या विमुक्त जाती विभागाचे पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष
सोलापूर : सेटलमेंट भागातील नऊ समाजापैकी टकारी समाजातील युवराज नारायण जाधव यांना काँग्रेस अंतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT) विभागाच्या पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी विमुक्त जाती व भटक्या जमाती विभागाच्या अध्यक्षा अॅड. पल्लवीताई बाळकृष्ण रेणके यांनी सोलापूर शहरातील विमुक्त जाती भटक्या जमातीचे तळमळीने काम करणारा युवक युवराज जाधव यांच्यावर विश्वासाने व्हि.जे.एन.टी. विभागाच्या पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे.
ह्या निवडीचे पत्र ११ मार्च, २०२४ रोजी काँग्रेस भवन, सोलापूर येथे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले.
त्यावेळेस सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, महाराष्ट्र प्रदेश जनरल सेक्रेटरी सुभाष चव्हाण, माजी महापौर अलका राठोड, व्हि.जे.एन.टी. प्रदेश संघटक मल्लेश सूर्यवंशी, व्हि.जे.एन.टी. जिल्हाध्यक्ष लक्ष्मण भोसले, व्हि.जे.एन.टी. प्रदेश महासचिव मोतीराम चव्हाण, व्हि.जे.एन.टी. प्रदेश सचिव भीमराव बंडगर, व्हि.जे.एन.टी. शहराध्यक्ष भारत जाधव, व्हि.जे.एन.टी. महिला अध्यक्ष अंजली मंगोडेकर, महिला शहर अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, हेमा चिचोळकर, रमेश जाधव, बालाजी जाधव, राजेंद्र शिरकूल, पप्पू गारे, समीर विजापुरे, श्रीकांत पवार, अशोक मदगुंडी, नाना पवार, अशोक पवार, आनंद गायकवाड, डेरेवाले विवेक जाधव, अंबादास जाधव, ज्ञानेश्वर जाधव, आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.