प्रणिती शिंदेंना शहरात मताधिक्य देण्यात युवक काँग्रेसने मारली बाजी ; गणेश डोंगरेनी स्वतःच्या प्रभागात दिला मोठा लीड
सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी 75 हजाराच्या मताधिक्याने विजयी मिळवला. शहर मध्य या मतदारसंघात काँग्रेसला निराशा झाली असली तरी काही नेत्यांनी आपल्या ताई साठी जीवाचे रान केले. त्यात शहर युवक अध्यक्ष गणेश डोंगरे यांचा वाटा आहे.
डोंगरे यांच्या प्रभाग क्रमांक 22 मध्ये सोलापूर शहरात सर्वात जास्त मताधिक्य प्रणिती शिंदे यांना मिळाले. प्रभागात 12000 च्या आसपास मतदान शिंदे यांना झाले. या प्रभागात रामवाडी मतदान केंद्रावर 8 बुथ असून 4600 पैकी 3500 च्या आसपास कॉंग्रेसला मतदान मिळाले असून या ठिकाणी गणेश डोंगरे यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर पडला.
सोलापूर शहरात युवक काँग्रेस अध्यक्ष जबाबदारी पार पाडत असताना स्वताच्या प्रभागात सुद्धा मताधिक्य दिले. गणेश डोंगरे यांच्याकडे शहर दक्षिण विधानसभा प्रभारी पदाची धुरा होती. माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे यांच्या मदतीने 25 कॉर्नर सभा शहर दक्षिण मध्ये यशस्वी केल्या. डोंगरे हे प्रणिती शिंदे यांचे कट्टर समर्थक मानले जातात.