त्या उमेदवारावर आम्ही FIR दाखल करणार ; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती ; काय आहे कारण
सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघासाठी चडचण येथील रहिवासी दिपक ऊर्फ व्यंकटेश्वरा महास्वामी यांनी अर्ज भरला आहे.
जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. ते म्हणाले, या व्यंकटेश्वरा महास्वामी याने लोकसभा निवडणुकीसाठी सोलापूर सोबतच अमरावती आणि नागपूर याठिकाणी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
तसेच विजापूर मतदारसंघातून ही अर्ज दाखल केल्याचे कळते. दरम्यान निवडणूक आयोगाच्या नियमा प्रमाणे लोकसभा निवडणुकीसाठी दोन मतदारसंघातून अर्ज दाखल करता येतो. पण त्या उमेदवाराने तीन मतदारसंघातून अर्ज दाखल केला, सोलापुरात अर्ज छाननी मध्ये त्यांचा अर्ज अवैध झाला. यामुळे त्या व्यंकटेश्वरा महास्वामी याच्या विरोधात आम्ही आता गुन्हा दाखल करणार असल्याचे आशीर्वाद यांनी सांगितले.