

प्रभाग 25 मध्ये धनुष्यबाण जोरात ; एकनाथ शिंदे यांच्या लाडक्या बहिणीकडून होतंय स्वागत
सोलापूर : यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 25 मध्ये बदलाचे वारे वाहत असून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला कंटाळलेल्या नागरिकांमधून आता एकनाथ शिंदे यांच्या धनुष्यबाण हाती घ्यायला नागरिकांचा पुढाकार वाढला आहे. ठिकठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या लाडक्या बहिणीकडून स्वागत होत आहे.
प्रभाग क्रमांक 25 मधून शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून धनंजय रामचंद्र कारंडे व शोभा प्रभाकर चौगुले हे निवडणूक लढवत आहेत. मंगळवारी हत्तूरे वस्ती भागातून काढण्यात आलेल्या पदयात्रेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.
यावेळी उमेदवार धनंजय कारंडे यांनी ठिकठिकाणी लोकभावना जाणून घेतल्या. मागील पाच वर्षात निराशा भंग झालेल्या परिसरातील नागरिकांनी मूलभूत सुविधांचा पाढा वाचला, तेव्हा कारंडे यांनी तुम्ही माझ्यासोबत राहा, येणाऱ्या काळात निश्चित या भागात बदल घडवून आणू असे आश्वासन कारंडे यांनी दिले.



















