सोलापूर : बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया च्या वतीने सोलापुरात बांधकाम क्षेत्रात वापरण्यात येणाऱ्या मशनरी चे भव्य असे प्रदर्शन भरवण्यात आले आहे हे प्रदर्शन सोमवार 25 डिसेंबर पर्यंत चालणार आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला सोलापूर शहराचे आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार प्रणिती शिंदे हे तीनही आमदार उपस्थित होते.
सुरुवातीला आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूर जिल्हा हा दुष्काळी म्हणून ओळखला जातो परंतु बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाने जर लक्ष घातले तर निश्चितच या सोलापूरला भवितव्य आहे आणि ‘सोलापूर या मोठ्या खेड्याचा’ विकास होईल, स्टेजवर देशमुखांची मेजॉरिटी असल्याने ते शक्य आहे असे भाषणात म्हणाले.
आमदार विजयकुमार देशमुख जेव्हा भाषणाला उठले त्यांनी सोलापूरचे महत्त्व विशद केलं एकेकाळी सोलापुरातून सोन्याचा धूर निघत होता, सोलापुरात मोठमोठे कारखाने कापड उद्योग चादर उद्योग आहेत, सोलापूरची चादर तर जगप्रसिद्ध आहे असे असताना आमदार सुभाष बापू यांनी सोलापूरला खेडे असे का म्हटले असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सुभाष देशमुख हे एक वेळा खासदार होते, तीन वेळा आमदार आहेत असे सांगून सोलापूरचा विकास करण्याचं काम आपल्या लोकप्रतिनिधीचा आहे आणि ते आपण सर्वांनी मिळून करावं अशी अपेक्षा व्यक्त केली.
सोलापूर खेडे या शब्दावरून दोन आमदार देशमुखांनी केलेल्या भाषणाची चर्चा सध्या सोलापुरात रंगू लागली आहे. कोण काय म्हणाले पहा हा व्हिडिओ