विडी कामगार महिलांचा निर्धार “अब की बार राम भाऊ खासदार” ; भाजयुमो राष्ट्रीय सरचिटणीस रोहित चहल यांनी केले मार्गदर्शन
सोलापुरात भाजयुमो राष्ट्रीय सरचिटणीस रोहित चहल यांच्या उपस्थितीत विडी कामगार महिलांचा मेळावा पार पडला, याप्रसंगी रोहित चहल यांनी विडी कामगार महिलांना मोदी यांचा नमस्कार सांगण्यासाठी मी दिल्लीहून आपणाकडे आलो असून, ज्या मोदी यांनी आपणास हक्काची 30 हजार घरे दिली. त्या मोदींना पुन्हा प्रधानमंत्री करायचे आहे असे प्रतिपादन केले याप्रसंगी सर्व महिलांनी “अब की बार राम भाऊ खासदार” चा नारा दिला.
याप्रसंगी महिला आघाडी शहर अध्यक्ष विजया वडेपल्ली, इंदिरा कुडक्याल, भाजयुमो प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने, भाजयुमो शहर सरचिटणीस बसवराज गदंगे यांनी 29 एप्रिल रोजी नरेंद्र मोदी यांच्या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले.