विधानसभेला ‘शहर उत्तर’ मध्ये भाजप भाकरी फिरविणार? हा लिंगायत चेहरा समोर येण्याची जोरदार चर्चा
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजपच्या चिंतन बैठका पार पडल्या. दिल्लीत नुकत्याच झालेल्या एका बैठकीत असं ठरल्याची चर्चा आहे की, देशातील येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत गुजरात पॅटर्न राबविण्यात यावा जेणेकरून नवीन नेतृत्वास संधी मिळेल, व ज्या विधानसभा मतदारसंघात तीनपेक्षा जास्त काळ एकच व्यक्ती आमदार असेल त्याची उमेदवारी कापली जाण्याची शक्यता दाट असल्याची माहिती समोर आली आहे.
या अनुषंगाने शहर उत्तर विधानसभा मतादरसंघात देखील गेली 20 वर्ष आमदार व मंत्री राहिलेले विजयकुमार देशमुख यांची अडचण होण्याची शक्यता असून त्यांच्या ठिकाणी भाजप व संघ या दोघांशी समन्वय ठेवणारा लिंगायत चेहरा समोर येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
भाजपने जर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात भाकरी फिरवली तर भाजपचे अनुभवी व लिंगायत चेहरा म्हणून चन्नवीर चिट्टे यांचे नाव समोर येण्याची दाट शक्यता आहे. वीरशैव लिंगायत मंचच्या माध्यमातून त्यांची राष्ट्रीय स्वंयसेवक संघातील सक्रियता ही त्यांच्या जमेची बाजू ठरू शकते.
कारण नांदेडचे डॉ अजित गोपछडे यांचे नाव ही राज्यसभेवर येण्याचे कारण ही वीरशैव लिंगायत मंच राहिले असल्याने व एकेकाळी स्व.गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू अशी चिट्टे यांची ओळख असून गेल्या 25 ते 30 वर्षपासून भाजपचे निष्ठावंत म्हणून प्रत्येक विधानसभा व लोकसभा निवडणुकीत यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. यंदा संघाचे पाठबळ व पक्षनिष्ठा याचे फळ हे दोन्ही गोष्टी यांना उमेदवारी मिळण्यासाठी फायद्याचे ठरेल अशी चर्चा आहे.