सोलापूर : देशातील डिजिटल मीडियाचे पहिले अधिवेशन महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या भव्य अधिवेशनाचे सुरुवातीच्या उद्घाटन पासून ते समारोप समारंभ पर्यंत सलग सात तास सोलापूरच्या प्रसिद्ध निवेदिका श्वेता हुल्ले यांनी सूत्रसंचालन केले. उद्घाटन समारंभ सलग साडे तीन तास चालला अधिवेशनाचे उद्घाटक राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत पाटील हे सुद्धा सोलापूरची निवेदिका हुल्ले यांचे संभाषण कौशल्य पाहून भारावून गेले, ते जेव्हा भाषणाला उठले तेव्हा त्यांनी प्रथम निवेदिका श्वेता ताई यांचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांना सत्कार करण्यास आवर्जून सांगितले. पहा हा व्हिडीओ…


















