सोलापूर : जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या समोर भाषण करताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणुन त्यांनी काही मागण्या केल्या, पाण्याची दुहेरी पाइपलाइन व बोरामनी विमानतळ पूर्णत्वास नेण्यासाठी आपल सहकार्य अपेक्षीत असल्याचे त्यांनी सांगितले..2014 साली राज्याचे उपुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत आपली भेट घेतली होती तेव्हा गडकरी साहेब मी तुमचा कडी भात खाल्लाय…, असे सांगत मी सार्वजानिक बांधकाम विभागाचा राज्यमंत्री आहे आमचं छोट आहे, तुमचं लय मोठं असे सांगत त्यांनी उपस्थितांना हसवले…


















