गावडी दारफळ मध्ये तीन दिवसाने तरुणाचा मृतदेह आढळला ! घातपात की काय?
सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील गावडी दारफळ या गावात संशयास्पद रित्या एका तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह गटारीमध्ये आढळून आला. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

अभिजीत नागेश मोरे असे त्या मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. अधिक माहिती घेतली असता समजले की, तीन दिवसापासून तो बेपत्ता होता परंतु गुरुवारी दुपारच्या सुमारास एका गटारामध्ये मृत अवस्थेत तो तरुण ग्रामस्थांना दिसून आला. तातडीने ग्रामस्थांनी सिविल हॉस्पिटल मधील लादेन यांची ॲम्बुलन्स बोलवून त्या मृतदेहाला गटारीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटल कडे रवाना केले.
दरम्यान गावामध्ये वाढलेले अवैध दारूचे धंदे यामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप होत आहे. मृतदेह अवैध दारूचा दुकानाच्या खालच्या गटारीत आढळून आल्याने या प्रकरणाची कसून चौकशी व्हावी अशी मागणी सिव्हील मध्ये जमलेल्या नातेवाईकांनी केली आहे.