उत्साहात रंगला उत्तर सोलापूर तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा
सोलापूर- पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने सिंहगड इन्स्टिट्यूट सोलापूर येथे सन २०२४-२५ तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला.
आपल्या कर्म साधनेतून संस्कृतीचे रक्षण करीत, भविष्याचा वेध घेत विद्यार्थ्यांना निर्भय, सुसंस्कृत, सुजान नागरिक घडवण्याचे मौल्यवान कार्य निस्वार्थपणे करणाऱ्या, सशक्त समाज तसेच देश घडवणाऱ्या आणि ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या उत्तर सोलापूर तालुक्यातील १९ आदर्श शिक्षकाचा पंचायत समिती उत्तर सोलापूर शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षणाधिकारी कादर शेख, गटविकास अधिकारी उत्तर सोलापूर बाबासाहेब पाटील, उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेली, राष्टीय महासंघाचे सचिव म.ज.मोरे, जिल्हा शिक्षक संघटना अनिरुद्ध पवार, भालशंकर सर, वडणे सर, वडाळा सरपंच जीतेद्र साठे, सिहगड एजीनिरींग कॉलेजचे संचालक संजय नवले, गटशिक्षणाधिकारी सिध्देश्वर निम्बर्गी, विस्तार अधिकारी बापूराव जमादार, विस्तार अधिकारी हरीश राऊत, शाहीन शेख, शंकर नवले, दत्तात्रय नवले यांच्या हस्ते सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कादर शेख यांनी आदर्श पुरस्कार प्राप्त सर्व शिक्षकांचे कौतुक करताना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. एक उत्तम विध्यार्थी घडवणे हे सर्व शिक्षकाचे काम आहे त्याचे उज्वल भविष्य हीच शिक्षकांच्या कार्याची पोहोच पावती आहे. विध्यार्थ्याच्या उन्नतीसाठी प्रयत्नशील रहावे असे आवाहन केले.
गेल्या काही वर्षापासून पंचायत समिती उत्तर सोलापूर शिक्षण विभाग येथील शिक्षक शिष्यवृत्ती परीक्षा, विविध स्पर्धा परीक्षा , व्यक्तिमत्व विकास स्पर्धा, इन्स्पायर अवॉर्ड, क्रीडा स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन अशा विविध क्षेत्रांमध्ये उत्तर सोलापूर तालुक्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे पाहता उत्तर सोलापूर तालुक्याचे शिक्षक कुठेही कमी नाहीत हे दिसून येते ही माझ्या तालुक्यासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे गौरवोद्गार गटशिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निंबर्गी यांनी काढले.
या आदर्श शिक्षक पुरस्कारांमध्ये तब्सूम अ. हमीद सय्यद (जिल्हा परिषद शाळा सलगरवाडी उर्दू), स्वाती हनुमंत चोपडे (गणेश नगर), माधुरी मधुकर दुरुगकर ( हागलूर) , सुरेश वासुदेव चव्हाण (सोरेंगाव) , राजश्री नानासाहेब माने, (गुळवंची), राजकुमार नागनाथ कांबळे (साखरेवाडी), सोमनाथ ज्ञानेश्वर मिसाळ जिल्हा परिषद शाळा( कारंबा मराठी ) स्मिता उद्धव फटे (मार्डी मराठी) तसेच क्रीडा क्षेत्रातील तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार राजेंद्र भारत पडदुणे (हिरज), तसेच तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार विशेष शरद अरुण गुंड ( कौठाळी ), नरगिडे शरद रेवणसिद्ध (संगमेश्वर नगर), शिवाजी पांडुरंग भोसले ( तेलगाव सिना), तालुकास्तरीय आदर्श शिक्षक माध्यमिक विभाग श्री अर्जुन भीमराव दळवी (शिवप्रभू विद्यालय), तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार शिष्यवृत्ती सौ शारदा सचिन शिंदे (प्रताप नगर),आशा प्रक्षाळे (कवठे तांडा) पल्लवी फुटाणे तसेच तालुकास्तरीय शिक्षक साधन व्यक्ती पुरस्कार श्री दत्तात्रय बिभिषण शिंदे ,नागराज प्रभाकर यावगल या शिक्षकांना सन २०२४-२५ तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
त्याचबरोबर “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्र.२ यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मार्डी प्रथम क्रमांक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलाटी द्वितीय क्रमांक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मजरेवाडी तृतीय क्रमांक,तसेच खाजगी शाळेमध्ये सिंहगड पब्लिक स्कूल केगाव प्रथम क्रमांक, के एल ई अण्णापा काडादी प्रशाला द्वितीय आणि नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल तृतीय क्रमांक या शाळांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
तसेच जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष संजय जवंजाळ व नवनीत फाउंडेशन चे श्री ढाले सर यांनी शिष्यवृत्ती परीक्षेची कार्यशाळा घेतल्यामुळे तालुक्यातील विद्यार्थी पात्र संख्या वाढल्याबद्दल शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व बी आर सी कर्मचारी ,सिद्धाराम माशाळे व सर्व केद्र्प्रमुख यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल थोरबोले व प्रिया सुरवसे यांनी केले तर आभार महताब शेख यांनी मानले.