मुंबईत अनेक विकास कामांचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार भाषण केले त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा गौरव करताना हे केवळ मोदी यांच्यामुळेच शक्य झाल्याचे सांगितले.
ते म्हणाले, कुठलेही राष्ट्र वा त्या देशाची सरकारी वित्तीय संस्था दुसऱ्या देशातील एका राज्यातील एखाद्या प्रकल्पाला किंवा प्राधिकरणाला कर्ज देत नाही. पण मी पंतप्रधानांना मोदीजी यांना विनंती केली तेव्हा इतिहासात पहिल्यांदाच परंपरा मोडून मोदीजींनी कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला आणि एका देशाने म्हणजे जपानची सरकारी संस्था असणारी (JICA) जायकाने MMRDA ला कर्ज दिल याबद्दल पंतप्रधानांचे खुप आभार मानतो.